HW News Marathi
देश / विदेश

एफएटीएफकडून पाकिस्तान ब्लॅकलिस्ट

नवी दिल्ली | पाकिस्तान जागतिक मापदंड पूर्ण न करू शकल्याने एफएटीएफच्या पॅसिफिक ग्रुपकडून त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी पाकिस्तानला फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ४० पैकी ३२ मापदंड पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता पाकिस्तानला जागतिक पातळीवर कर्ज मिळणे अवघड होणार आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत पोहोचवणे बंद करण्यासाठी पाकिस्तानकडून जानेवारी महिन्यापर्यंत ऍक्शन प्लॅन तयार करणे अपेक्षित होते. जमात-उद-दावा, फलाही-इंसानियत, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि अफगाण तालिबानला यांना होणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तान त्यात अपयशी ठरले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आर्थिक मदत सुरुच असल्याने एफएटीएफकडून ही कारवाई करण्यात आहे. यापूर्वी एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआयचे दोन्ही अधिकारी सक्तीच्या रजेवर, नागेश्वर राव अंतरिम प्रमुख

Gauri Tilekar

महीला आयएएस अधिकारी लैंगिक छळाची शिकार

News Desk

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरपर्यंत येणारी ‘ती’ महिला कोण ?

News Desk