HW News Marathi
देश / विदेश

नवाज शरीफ यांना सात वर्षांची सजा

नवी दिल्ली | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल-अजीजिया भ्रष्टाचार प्रकरणी इस्लामाबादच्या न्यायालयाने ७ वर्षांची सजा सुनावली आहे. त्याच बरोबर २५ लाख डॉलर चा दंड देखील सुनावण्यात आला आहे. कोर्टात निर्णय जाहीर केल्यानंतर नवाज यांना कोर्टात अटक करण्यात आली.नवाज शरीफ यांना फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

एव्हनफिल्ड प्रॉपर्टीज, फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल-जजीजिया प्रकरण २०१७ मध्ये उघडकीस आले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी न्यायालयात अनेकदा अपील करण्यात आले. मात्र, आज न्यायालयात फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल- अजीजीया प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी नवाज शरीफ यांना निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, २५ मिलीयन डॉलर दंड सुद्धा न्यायालयाने ठोठावला आहे. न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक यांनी याप्रकरणावर निर्णय दिला.

दरम्यान, नवाज शरीफ आधीपासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांचे पतंप्रधान पद बरखास्त केले होते. या निर्णयावेळी सर्वोच्च न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री झाली होती. समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार | परराष्ट्रमंत्री

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान जखमी

Gauri Tilekar