HW News Marathi
देश / विदेश

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

पाकिस्तान | सुप्रीम कोर्टाने पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोषी ठरवले आहे. पाकिस्तानाच्या नाही तर जगाच्या राजकारणामध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे खळबळ माजली आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार कलम ६२ (१) (एफ)च्या आतंर्गत त्यांना आयुष्यभर दोषी ठरविण्यात आले आहे.

कलम ६२ (१) (एफ) म्हणजे नवाझ शरीफ यांना यापुढे कुठलेही सरकारी पद स्वीकारता येणार नाही. या निर्णयानंतर नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली असून पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार करण्यात आले.

पनामा पेपर लीक प्रकरण

४ एप्रिल २०१६ रोजी एका आंतरराष्ट्रीय पत्राकांनी पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव असल्याचे छापले होते. यानंतर पाकिस्तानी सरकारने भष्ट्राचाराची चौकशीसाठी संयुक्त पथके तयार करण्यात आली होती. नवाझ शरीफ यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. शरीफ यांच्या कुटुंबीयाचे देखील नाव आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…भाजपच्या विधान परिषदेच्या ४ उमेदवारांबद्दल ही माहिती 

News Desk

टायगर अभी जिंदा है’, वर ज्योतिरादित्य यांना दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर

News Desk

आज पाहा वर्षातील पहिले ‘छायाकल्प’ चंद्रग्रहण

News Desk