HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तान करणार ‘या’ भारतीय नागरिकाची सुटका

नवी दिल्ली | खोट्या कागदपत्रांसह पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा आरोप करुन अटक केलेल्या भारतीय नागरिकाची मंगळवारी (१८ डिसेंबर) सुटका होणार आहे. पेशावर उच्च न्यायालयाकडून सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. त्या व्यक्तीचे नाव हमीद अन्सारी असे आहे. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या हमीद अन्सारीला पेशावरमधील मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतच वृत्त दिले आहे.

हमीद अन्सारी यांनी ‘हमजा’ या खोट्या नावाने कागदपत्रे बनवून पाकिस्तानामध्ये घुसखोरी केल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. हमीद अन्सारी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका मुलीला भेटण्यासाठी ते नोव्हेंबर २०१२ रोजी अवैधपणे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अन्सारी यांना पकडले होते.

खोट्या कागदपत्रांसह हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा आरोप करत त्यांना तीन वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. मात्र, शिक्षा पूर्ण भोगल्यानंतरही पाकिस्तानने अन्सारी यांची सुटका झाली नाही. त्यानंतर अन्सारी यांच्या वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. अखेर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. हमीद अन्सारी हे मूळचे मुंबईचे रहिवासी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस

News Desk

दीदी ओ दीदी… शरद पवार आणि संजय राऊतांकडून माता बॅनर्जींचं अभिनंदन!

News Desk

मी कर्ज फेडेन पण व्याज देऊ शकणार नाही !

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री पदी विराजमान होताच कमलनाथ यांच्या अडचणीत वाढ

News Desk

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु कमलनाथ मुख्ममंत्री पदी विराजमान होताच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. १९८४ च्या शीख दंगलीत कमलनाथ यांचे नाव पुढे आले आहेत. त्यामुळे कमनलथा यांच्या मुख्यमंत्री न करण्याची मागणी भाजपने केली आहे. शीख दंगलीत प्रकरणात काँग्रेजच्या नेता सुज्जत कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. दंगत प्रकरणात कमलनाथ आल्याने या नावाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाला आहे. हे काँग्रेसची ही कृती निषेधार्ह असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.

सज्जन कुमार यांना दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात कलमनाथ यांचे नाव आल्यानंतर शीख समाज त्या व्यक्तीला दोषी समजतो, काँग्रेस त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. काँग्रेसकडून गेलेली ही शीक समाजाची मोठी थट्टा केल्याचा आरोप अरुण जेटली यांनी केला आहे. पुढे जेटली असे देखील म्हणाले की, सज्जन कुमार शीख दंगलीचा चेहरा होते आणि या हत्याकांडाचे डाग काँग्रेस आणि गांधी परिवारावर कायम राहणार आहेत.

शीख दंगलीवरून भाजप नेते काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्यावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह बचावासाठी पुढे सरसावले आहे. सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘या प्रकरणातील एफआयआरमध्ये किंवा आरोपपत्रात कमलनाथ यांचे नाव नाही. कोणत्याही न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू नाही. ते ११९१ पासून केंद्रात मंत्री होते. तेव्हा भाजपला आक्षेप नव्हता. परंतु आताच नेमके काय झाले?,’ असा सवाल सिंह यांनी जेटली आणि भाजपा नेत्यांना विचारला आहे.

Related posts

हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे !

swarit

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Aprna

राणेंचा मंत्रीमंडळ प्रवेश लांबणीवर, हिवाळी अधिवेशनानंतर होणार मंत्रीमंडळ विस्तार

News Desk