HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानने शारीरिक नाही तर माझा मानसिक छळ केला !

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांनी शारीरिक नाही तर माझा प्रचंड मानसिक छळ केला , असे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनंदन हे शुक्रवारी (१ मार्च) रात्री ९ वाजून २१ मिनिटाने पाकिस्तानातून  मायदेशात परतले आहे. अभिनंदन यांनी तब्बल ६० तासांच्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतले.

अभिनंदन बुधवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. अभिनंदन यांचे मिग-२१ विमान पाकिस्तानच्या वायुसेनेच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. परंतु याआधी अभिनंदन यांनी पाकिस्तानी वायुसेनेच्या ताफ्यातील एफ-१६ विमान पाडले होते. पाकिस्तानची विमाने भारतीय वायुसेनेच्या हद्दीत घुसल्यानंतर भारतीय वायुसेनेने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेली ही कारवाई होती. पाकिस्तानची विमाने भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नान होते. परंतु भारतीय वायुसेनेने त्यांचा पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला.

अभिनंदन जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये लगेच पॅराशूटद्वारे खाली उतरले. तेव्हा काही स्थानिकांनी त्यांना मारहाण देखील केली होती. यानंतर दोन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. परंतु याआधी अभिनंदन यांनी मोठ्या चातुऱ्याने त्यांच्याकडील गोपनीय कागदपत्रे नष्ट केली. पाकिस्तानेच पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा त्यांच्या संसदेत केली होती.

Related posts

चंद्राबाबू नायडू यांना भाजपने दिला मोठा धक्का

News Desk

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

दहशतवादासाठी यापुढे पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही !

News Desk