HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत, हवाई हद्दीचे उल्लंघन

नवी दिल्ली | भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळत आहे. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

परिणामी, लेह, जम्मू, पठाणकोट विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला असून श्रीनगर, चंदिगढ, अमृतसर ही विमानतळे नागरी उड्डाणांसाठी पुढील ३ तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या हवाई हद्दीत खुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायू दलाकडून पिटाळून लावण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भारतीय वायू दलाने पाकिस्तानी वायू दलाचे एफ-१६ हे विमान पाडल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…उशीरा का होईना शहाणपण आलं!”, पवारांची मोदींवर टीका

News Desk

#Amritsar : रावणाची भूमिका साकारणाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू

Gauri Tilekar

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विचार याचिका दाखल !

News Desk