HW News Marathi
देश / विदेश

डोक्याला चेंडू लागून पाकिस्तानी खेळाडूचा मृत्यू

कराची – क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच घडणारी दुर्दैवी घटना सोमवारी पाकिस्तानात घडली आहे. बॅटींग करीत असताना अचानक उसळलेला चेंडू डोक्यावर आदळल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. झुबेर अहमद असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या फखर जमान अकादमीचा सदस्य होता. पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनीच त्याच्यावर काळाने घाला घातला.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत अंदाज न आल्याने चेंडू त्याच्या थेट डोक्यावर आदळला. हेल्मेट न घालता फलंदाजी करीत असल्यामुळे हा घाव त्याच्या वर्मी बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून झुबेरच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. खेळताना नेहमी हेल्मेट वापरावं आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे पीसीबीने ट्विट करून म्हटले आहे.

क्रिकेट मैदानावरील जीवघेणे अपघात

– 2014 : देशांतर्गत सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यू झाला होता.

-2012 : सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती.

-2012 : झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा स्थानिक सामन्यात जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागला आणि त्याचा पिचवर मृत्यू झाला.

-1998 : भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी. उपचारांदरम्यान मृत्यू.

-1961-62 : भारताच्या नरी कॉण्ट्रॅक्‍टर यांना विंडीजच्या ग्रिपिथचा चेंडू डोक्‍याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने कॉण्ट्रॅक्‍टर यांचा जीव वाचला, पण तो पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत.

-1958-59 : पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk

Republic Day | इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा

News Desk

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती! – रामराजे नाईक-निंबाळकर

Aprna