HW Marathi
देश / विदेश मुंबई

मुंबई हल्ल्यामागचा म्होरक्या हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास

इस्लामाबाद  | पाकिस्तानमधील कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर २०१९ मध्ये १७ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना १० वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हाफिज सईदला यापूर्वीदेखील कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्कर ए तोयबाची फ्रंट ऑर्गनायझेशन Jamaat-ud-Dawa चा प्रमुख असलेल्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२० मध्ये ११ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Related posts

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

Arati More

राऊत- फडणवीस यांच्या भेटीला राजकीय अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

News Desk