नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतावर दबाव वाढविण्यासाठी पाकिस्तानकडून भारत-पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी ‘समझौता एक्सप्रेस’ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांकडून याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. दरम्यान, समझौता एक्सप्रेस किती काळासाठी बंद ठेवण्यात येईल, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पाकिस्तानकडून देण्यात आलेली नाही.
Pakistan Railways Minister Sheikh Rashid Ahmed: In a decision by the Railways Ministry, Samjhauta Express services have been permanently stopped. It used to ply twice a week. The people who had already purchased their tickets can get their money reimbursed from Lahore DS office. pic.twitter.com/ZVNOTEsQRZ
— ANI (@ANI) August 8, 2019
Punjab:Train engine for Samjhauta Express leaves from Attari railway station,for Pak. Station Master says “Services haven’t stopped. Pak’s driver&guard refused to come to India. So they sent us message to send engine with Indian crew&guard. They’ll go with engine&bring the train” pic.twitter.com/L655YLrMaU
— ANI (@ANI) August 8, 2019
“आपण युद्धाला तयार आहोत”, असे म्हणत पाकिस्तानकडून सीमारेषेवर सैन्यही वाढविण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एकीकडे बुधवारी (७ ऑगस्ट) पाकिस्तानकडून भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्यात आले. तसेच, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतासाठी ६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर इतक्या काळासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता पाकिस्तानकडून अनिश्चित काळासाठी समझोता एक्सप्रेस थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.