नवी दिल्ली | पाकिस्तानकडून अद्याप भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरुच आहेत. पाकिस्तानी हवाई दलाकडून पुन्हा एकदा मंगळवारी (१२ मार्च) रात्री भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या वायू दलाची २ लढाऊ विमाने पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दिसल्याचे वृत्त, एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Pak jets went supersonic while flying over PoK last night, Indian air defence systems on alert
Read @ANI Story | https://t.co/hPq74AIm1L pic.twitter.com/CBk4Fsa3dq
— ANI Digital (@ani_digital) March 13, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाच्या १२ ‘मिराज २०००’ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर १००० किलोंचे बॉम्ब टाकल्यानंतर २७ फेब्रुवारी पाकिस्तानने भारतीय वायू दलाच्या हद्दीत घुसून लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय वायू दलाने पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.