HW Marathi
देश / विदेश

दहशतवादासाठी यापुढे पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही !

नवी दिल्ली | “दहशतवादासाठी यापूर्वी पाकिस्तानच्या भूमीचा वापर केला गेला असेल, मात्र यापुढे हा वापर होऊ देणार नाही”, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. शुक्रवारी (८ मार्च) इम्रान खान यांनी दहशतवादी संघटनांना हा इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील यापूर्वीच्या सरकारांवर दहशतवादाला पोसल्याचा आरोप आहे. तर इम्रान खान यांच्या सरकारकडून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढलेल्या दबावामुळे पाकिस्तानकडून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या २ भावांसह एकूण ४४ दहशतवाद्यांना अटक केली होती. त्याचप्रमाणे, पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाई करत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे देखील पाकिस्तानकडून सांगण्यात आले.

Related posts

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk

अलाहाबादनंतर शिमलाचे नाव बदलून श्यामला होणार ?

Gauri Tilekar

Section 377 | एलजीबीटी समुदायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक

News Desk