HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय दबावाला समोर जावे लागत असताना देखील पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील राजौरी येथील बट्टल परिसरात पाकिस्तानी सैन्याने सोमवारी (१८ मार्च) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात भारताचा १ जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी आहेत. करमजीत सिंह (२४) असे शहीद जवानाचे नाव आहे.

करमजीत सिंह हे मूळचे पंजाबचे आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी दिवसभरात तब्बल १०० हुनही अधिक वेळा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात करमजीत सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नजीकच्या रुग्णालयात अन्य जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.

Related posts

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

News Desk

राम मंदिराविषयी लवकर तोडगा काढला नाही तर, भारताची अवस्था सीरीयासारखी होईल | श्री श्री रविशंकर

News Desk

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन