HW News Marathi
देश / विदेश

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकाराची हत्या

पंजाब(वृत्तसंस्था): पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रींचा मृतदेह शनिवारी दुपारी राहत्या घरात सापडला. या दोघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. या घटनेचा पंजाबमध्ये सर्वच स्तरातून निषेध होत असून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.

मोहालीतील फेज ३ बी २ येथे के जे सिंग हे त्यांच्या मातोश्री गुरचरन कौर यांच्यासह राहत होते. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी दोघांचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. दोन्ही मृतदेहांच्या गळ्यावर वार केल्याचे दिसते. त्यामुळे ही हत्या असू शकते असे पोलिसांनी सांगितले. सिंग यांच्या घरातून काही मौल्यवान दागिने आणि घरासमोरील कार गायब असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमणार असल्याची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#JamiaProtests : प्रियंका गांधींचे इंडिया गेटसमोर ठिय्या आंदोलन

News Desk

ममता बॅनर्जी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

News Desk

अमेरिकेकडून सीरियावर हवाई हल्ला

News Desk