HW News Marathi
देश / विदेश

परीक्षा पे चर्चा २.० : आपली स्वप्ने आपल्या मुलांवर थोपविणे अयोग्य | मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा २.०’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. “तुम्ही असे समजा कि तुम्ही तुमच्या कुटुंबासह बसले आहात आणि त्या कुटुंबातील एका सदस्यांशी तुम्ही बोलत आहात. विद्यार्थी, पालक किंवा शिक्षकांना उपदेश देण्याचा माझा उद्देश नाही”, असे मोदी म्हणाले. “मी पालकांना असे सांगू इच्छितो कि ते पालक चुकीचे आहेत जे आपली स्वप्न आपल्या मुलांवर थोपवून पूर्ण करू इच्छितात”, असे मोदी म्हणाले.

“आई-वडील कोणत्याही कौटुंबिक समारंभास जातात तेव्हा ते आपल्या मुलांच्या प्रगतीपुस्तके एखाद्या व्हिझिटिंग कार्डप्रमाणे वापरतात. ही सर्वात मोठी समस्या आहे. याचमुळे तुमचे यश आणि अपयश हे तुमच्या पालकांच्या सामाजिक जीवनावर परिणाम करते”, असेही मोदी म्हणाले.

“आई-वडिलांनी आपल्या मुलांना तसेच पाहिले पाहिजे जसे ते त्यांच्या बालपणी पाहत असत. तो खाली पडत असताना त्याला ओरडून त्याच्यात बदल होणार नाहीत. अपेक्षा देखील गरजेच्या आहेत कारण अपेक्षांमुळे आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. तुमची स्वप्न देखील असावीत आणि अपेक्षा देखील असावीत. मात्र, फार दबाव आणला तर परिस्थिती बिघडू शकते”, असेही मोदी म्हणाले.

कार्यक्रमातील या चर्चेदरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “परीक्षांचे महत्त्व तर आहेच, ते कुणीही नाकारू शकत नाही. असेही म्हणू शकत नाही कि तुम्ही शिकू नका, जे होईल ते पाहिले जाईल. परंतु, हे लक्षात घ्यायला हवे कि ही परीक्षा आयुष्याची आहे कि फक्त एका इयत्तेची. आयुष्य हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित नाही. त्यापुढे आयुष्य असते.”

“खूप पूर्वी मी एक कविता वाचली होती. काही खेळणी तुटल्याने लहानपण मरत नाही. तसेच परीक्षांमध्ये काही अडचणी आल्याने सर्व आयुष्य खराब होत नाही. आयुष्यात अशा अनेक परीक्षा असतात ज्या पार केल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, नवी ताकद मिळते. आयुष्याच्या अर्थ आहे वेग, गती. आणि गती नसेल तर आयुष्याला काय अर्थ आहे ?”, असेही मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही !

News Desk

सलग १३व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

श्रीनगरमधील पोलीस चौकीत दहशतवादी हल्ला

News Desk