मुंबई | गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज (१२ ऑक्टोबर) शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार,२०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर करण्यात आला आहे.
नोबेल पारितोषिकांत सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.27 कोटी) दिले जाते. स्वीडिश क्रोना हे स्वीडनचे चलन आहे. हा पुरस्कार स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेलच्या नावे देण्यात आला आहे. यापूर्वी यावर्षीचे नोबेल पुरस्कार रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासह अनेक क्षेत्रात जाहीर करण्यात आले आहे.
BREAKING NEWS:
The 2020 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Paul R. Milgrom and Robert B. Wilson “for improvements to auction theory and inventions of new auction formats.”#NobelPrize pic.twitter.com/tBAblj1xf8— The Nobel Prize (@NobelPrize) October 12, 2020
काय आहे ‘हा’ लिलावाचा सिद्धांत?
ऑक्शन थेअरी किंवा लिलावाच्या सिद्धांताचा वापर करीत एखादी वस्तू विकत घेणारा बोली लावताना आणि अंतिम किंमत ठरवताना विविध नियमांना समजणून घेण्याचा प्रयत्न करतो. याबाबतचे विश्लेषण कठीण असते कारण उपलब्ध माहितीच्या आधारे बोली लावणारे रणनीती आखून व्यवहार करतात. ते दोन्ही बाजू लक्षात घेऊन स्वतःला त्या वस्तूची किती माहिती आहे आणि बोली लावणाऱ्याला याची किती माहिती आहे, याचा अंदाज घेतात
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.