HW News Marathi
Covid-19

काबूलहून 168 जणांना घेऊन वायूदलाचं विमान भारतात परतलं…

दिल्ली | अफगाणिस्तानात अडकलेल्या 168 नागरिकांना घेऊन भारतीय वायूदलाचं C-17 हे विमान आज सकाळच्या सुमारास भारतात परतलं.दिल्लीनजीकच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हे विमान उतरवण्यात आलं. या विमानातून 107 भारतीय नागरिकांसह एकूण 168 जण भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, आजच ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश होता.

आणखी एक विमान कतारची राजधानी दोहामार्गे भारतात येणार

विमानतळाबाहेर पडण्याआधी या सर्व प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागणार आहे.काबूलमध्ये सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आणखी एक विमान कतारची राजधानी दोहामार्गे भारतात येणार आहे. हे विमान 135 भारतीयांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.इस्लामिक स्टेटकडून हल्ल्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी काबूल विमानतळाचा वापर करू नये असं आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केलं आहे.

इस्लामिक स्टेटने जाहीरपणे हल्ल्याची धमकी दिलेली नाही

काबूल विमानतळावर आमची निगराणी असून, पर्यायी मार्ग काही आहेत का याची चाचपणी करत असल्याचं अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं.इस्लामिक स्टेटकडून हल्ल्यासंदर्भात अन्य कोणताही तपशील अमेरिकेने जाहीर केला नाही. इस्लामिक स्टेटने जाहीरपणे हल्ल्याची धमकी दिलेली नाही.अमेरिकेबरोबर काम करणारे, सहकारी देशांचे प्रतिनिधी, मानवाधिकारासाठी कार्यरत मंडळी यांना देश सोडून जायचं नाही. तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांना जीवाचा धोका संभवतो आहे. यामुळे काबूल विमानतळाबाहेर हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होते आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत केईएम रुग्णालयात कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरु

News Desk

देशात ५७,९८२ नवे कोरोना रुग्ण तर ९४१ रुग्णांचा झाला मृत्यू

swarit

जॉन्सन कंपनीच्या ‘सिंगल डोस’ लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार!

News Desk