नवी दिल्ली | “राम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे. राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच”, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा केला आहे. उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (१६ जून) आपल्या १८ विजयी खासदारांसह अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने या लोकसभा निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता.
No one can stop Modi-led govt from building Ram temple, says Uddhav Thackeray
Read @ANI story | https://t.co/kIInXkETlm pic.twitter.com/BkA6G5KaPz
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2019
“ही जागा अशी आहे जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा. कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंमध्ये एकता कायम राहिली पाहिजे”, असे उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले. “पहिले मंदिर आणि नंतर संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.