HW News Marathi
Covid-19

ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी २० जण कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह महाराष्ट्रात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. नियोजित विमान काल (२२ डिसेंबर) देशात विविध ठिकाणी दाखल झाले. यातून आलेल्या प्रवाशांपैकी २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा आजपासून (२३ डिसेंबर) ते ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे. काल ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले.

ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या २० पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या ६, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या २, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या ४ आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.

भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही, असं निती आयोगचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदेवबाबांनी ‘ती’ चूक केली मान्य,अॅलोपॅथीला म्हणाले होते ‘मूर्ख विज्ञान’

News Desk

स्थलांतरित कामगारांना १५ दिवसात परत पाठवा – सर्वोच्च न्यायालय

News Desk

पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे

News Desk