HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या काळात पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी वाढणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, पेट्रोलचा दर ८० रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. तर, डिझेलच्या दरातही वाढ होणार आहे. डिझेलचा दर ६५ रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. २०१५ सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आता पेट्रोलच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच नागरिकांना महागाईचा झटका लागण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रात्री १० नंतरही मी फटाके फोडणार !

Gauri Tilekar

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

swarit

सर्वोच्च न्यायालयाने राफेल कागदपत्रे चोरी प्रकरणाचा निर्णय ठेवला राखून

News Desk