HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल २१ तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त

मुंबई | आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा घट झालेली पाहायला मिळत आहे. पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा २१ पैशांनी तर डिझेलच्या किंमतींमध्ये १८ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलची किंमत ८४.२८ रुपये तर डिझेलची किंमत ७६.८८ इतकी झाली आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या किंमतींमध्ये २१ पैशांनी आणि डिझेलच्या किंमतींमध्ये १७ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७८.७८ रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७३.३६ रुपये इतकी झाली आहे.

गेले अनेक दिवस सलग इंधनाच्या किंमतींमध्ये घट होत आहे. मात्र काहीच दिवसांआधी देशात दर दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत असल्याचे त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आले होते.

मध्यंतरीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! आज संध्याकाळी मोदी सरकारचा विस्तार, ४ मंत्र्यांचे राजीनामे, ४३ नेते मंत्री म्हणून शपथ घेणार!

News Desk

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती गंभीर

News Desk

कृषी विधेयकावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं चित्र संसदेत दिसलं, सामनातून केंद्रावर टीका

News Desk