HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दरवाढ कायम

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या एक्साईज ड्यूटी १.५० रुपये कमी करण्याची घोषणा केली. यानंतर पेट्रोल उत्पादन कंपन्यांनी १ रुपयांकडून असे मिळून २.५० रुपयांनी पेट्रोल-डिझेलची किंमत कमी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे भाजप शासित राज्यात त्यांची अंमलबजावणी केली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.५० रुपयींनी पेट्रोल-डिझेल स्वस्त केले.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ कायम आहे. मुंबई आज (रविवार ६ ऑक्टोबर) पेट्रोल प्रतिलिटर मागे ०.१४ पैशांनी वाढले तर डिझेल प्रति लिटर मागे आहेत. यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ८७.२९ रुपये आणि डिझेलसाठी ७७.०६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८१.८२ रुपये म्हणजे ०.१४ पैशांनी वाढले तर डिझेल प्रतिलिटर ७३.५३ रुपये म्हणजे ०.२९ पैशांची वाढ पैसे वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या सतत होणाऱ्या वाढीमुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले होते. राज्य सरकारने केलेली कपात मिळून डिझेल ४ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र इंधन दरवाढीचा भडका उडत आहेच.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या कोरोना स्ट्रेनला भारतात रोखण्यात आले यश

News Desk

लोकशाही धोक्यात असेल तर विशेष अधिवेशन बोलवा : यशवंत सिन्हा

News Desk

#Coronavirus : आता पेट्रोल पंपावर No Mask No Fuel

News Desk