HW Marathi
देश / विदेश राजकारण

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर बनवण्याच्या मोदींचा संकल्प

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जुलै) त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर केला असून तेथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मोदींनी देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची बनवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केले. विकसित होण्यासाठी देश आता अधिक वाट पाहू शकत नाही, असे मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

वाराणसी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ”देश आता विकसित होण्यासाठी फार काळ वाट पाहू शकणार नाही. आता स्वप्ने आणि शक्यतांवर चर्चा होणार आहे. या स्वप्नांपैकीच एक आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भारताची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही, पण आज मी जे लक्ष्य निश्चित केले आहे. ते तुम्हालाही विचार करावयास भाग पाडेल. नवीन लक्ष्य नवीन स्वप्नांना घेऊन आम्ही पुढे जाऊ हाच मुक्तीचा मार्ग असेल.”

वाराणसी दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री उपस्थित होते. तसेच मोदींनी उत्तर प्रदेशमधील वृक्षारोपन अभियानाचीही सुरुवात केली.

Related posts

#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

मनसेचा महाआघाडीत समावेश होणार ?

Gauri Tilekar

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

Ramdas Pandewad