गुजरात | अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
या पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तातडीच्या मदत कार्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्यातील नुकसानीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकार एक आंतर-मंत्रालयीन पथक देखील राज्य दौर्यासाठी तैनात करणार आहे. त्याचबरोबर वादळात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुबीयांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे.
अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तौक्ते चक्रीवादळ स्थितीसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून ओएनजीसी बार्जवरील जवानांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाचा आढावा घेतला. गुजरातमध्ये चक्रीवादळाने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आणि बरीच घरे व रस्ते खराब झाले.
Gujarat: Prime Minister Narendra Modi holds a review meeting in Ahmedabad, to assess the situation and damage caused by #CycloneTauktae. CM Vijay Rupani also present among other officials.
PM conducted an aerial survey of cyclone-affected areas of Gujarat & Diu, earlier today. pic.twitter.com/Qtjme5aCSr
— ANI (@ANI) May 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.