नवी दिल्ली | भारत-चीन सीमा भागात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या अध्यक्षांचा समावेश असले. गेल्या काही दिवसांत भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने आज (१७ जून) याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
In order to discuss the situation in the India-China border areas, Prime Minister @narendramodi has called for an all-party meeting at 5 PM on 19th June. Presidents of various political parties would take part in this virtual meeting.
— PMO India (@PMOIndia) June 17, 2020
कोरोनाचे संकट एकीकडे मोठे होत जात असताना आता दुसरीकडे देशासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन संघर्ष पुन्हा उफाळून यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. दिवसेंदिवस भारत-चीनमधील हा वाद चिघळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.