नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काल (७ जुलै) ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आजपासूनच पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी मोदींनी मंत्रीमंडळातील नवीन सहकाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये मोदींनी प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
काल शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलाय., १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री आहेत. कालच्या शपथविधीनंतर आज लगेचच मोदी २.० टीमने आपलं काम सुरु केलं. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासहीत आज देशातील वेगवेगळ्या आयआयटीच्या संचालकांशी चर्चा केली आहे.
PM began work with the new ministers, a day after #CabinetReshuffle. He interacted with Directors of centrally funded technical institutions like IIT Bombay, IIT Madras, IIT Kanpur & IISc Bangalore via video conference today. New Education Min Dharmendra Pradhan was also present. pic.twitter.com/22SueiEWAD
— ANI (@ANI) July 8, 2021
जवळजवळ सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून मोदींनी या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचं काम समजून घ्यावं असं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचं कामकाज लवकर सुरु करावं अशा सुचना नवीन सहकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्लाही मोदींनी या नवीन मंत्र्यांना दिल्याचं समजतं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.