HW News Marathi
देश / विदेश

नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये काल (१९ ऑगस्ट) तब्बल ३० मिनिटे फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानकडून चिथावणीखोर विधाने या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली. जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्यांनी साधलेला हा पहिलाच उच्चस्तरीय संवाद असल्याचे बोले जाते.

या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता मोदी म्हणाले की, पाकिस्तानमधील नेते भारताविरुद्ध करीत असलेली चिथावणीखोर विधाने आशियाच्या शांततेसाठी अनुकूल नाहीत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी व्हावा, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी ३० मिनिटांच्या या चर्चेदरम्यान व्यक्त केली.

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीच माहिती देत अशा परिस्थितीत भारतविरोधी आणि हिंसक वक्तव्य शातंतेत भंग करू शकते. हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करणे आणि दहशतवाद मिटवण्याबाबत पावले उचलण्याची गरज असल्याचे मोदींनी चर्चे म्हणाले. तसेच शिक्षण, गरीबी, आरोग्य या मुद्द्यांवर काम करण्यास तयार असलेल्या देशांना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही मोदींनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्याशी इम्रान खान यांनी फोनवरून संपर्क साधला होता. काश्मीर प्रश्न भारताशी द्विपक्षीय मार्गाने सोडवावा, असे ट्रम्प यांनी त्यांना सांगितले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk

अखेर जीवघेणा ‘ब्ल्यू व्हेल’ नष्ट!

News Desk

मोदी सरकारला मोठा धक्का ! कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची अंतरीम स्थगिती

News Desk