HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत पंतप्रधान मोदींचा नारा ‘अब की बार ट्रम्प सरकार’

ह्युस्टन | अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने आयोजित ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी ह्युस्टमध्ये एनआरजी स्टेडियममध्येकाल (२२ सप्टेंबर) उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना मोदींनी ‘अब की बार ट्रम्प सरकार’ म्हणत ट्रम्प यांना पुन्हा एकदा निवडूण देण्याचे आव्हान केले आहे. यावेळी दोघांनीही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी ५० हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना संबोधित केले. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही स्वागत केले. यावेळी त्यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी भारतीयांना आवाहन केले. अमेरिका भारताचे चांगले मित्र आहेत.

यावेळी “इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाविरुद्धच्या लढाईत आम्ही नेहमी भारतासोबत उभे राहू,” असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणादरम्यान नाव न घेता पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला आहे. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांची स्तुती करत म्हणाले की, अमेरिकेला पुन्हा महासत्ता बनवायाला निघाले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करून दाखविले आहे. त्याच्याबद्दल आपुलकी वाटत आहे, ”अबकी बार ट्रम्प सरकार” असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.

पुढे बोलताना मोदी यांनी ‘काही लोकांना आपला देश सांभाळता येत नाही मात्र ते भारताच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करतात. राजकारण करण्यासाठी काही मंडळी दहशतवाद्यांना पोसत आहेत. अमेरिका किंवा भारतात जे दहशतवादी हल्ले झाले त्यासाठी दहशतवाद्यांना कोण खतपाणी घालतं ते सर्वांना माहिती आहे असं म्हणत इमरान खान यांना टोला लगावला आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोल्याचे पाच जण गोवा बीचवर बुडाले

News Desk

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna