HW Marathi
देश / विदेश

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेरले, गव्हर्नरशी चर्चा करणार

मुंबई | पंजाब महाराष्ट्र बँकेच्या संतप्त खातेधारकांनी आज (१० ऑक्टोबर) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुंबईतील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आरबीआयने पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. बँकेवरील सर्व निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी सीतारामन यांना घेतले होते. मुंबईत आलेल्या निर्मला सीतारामन भाजपाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात असताना पीएनसी बँकेच्या खातेधारकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला.

यानंतर सीतारामन यांना पत्रकारांशी संवाद साधला. सीतारामन म्हटल्या की, आज संध्याकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी बोलून पीएमसी बँकेच्या खातेधारकांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देईन, असे त्या म्हणाल्या. ग्राहकांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करेन, असेदेखील त्यांनी पुढे सांगितले.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार २४ सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने ३५ए अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढील सहा महिन्यासाठी बंद करण्याचे आदेश दिले. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरू ठेवण्यास आरबीआयने परवानगी नाकारली. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांना आता तीन महिन्यातून एकदा फक्त एक हजारापर्यंतच्या ठेवी काढता येणार आहे. अचानक पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

 

 

Related posts

पीटीआयचे सत्ता स्थपानेसाठी १५८ इतके संख्याबळ

अपर्णा गोतपागर

इंदूरमध्ये डाॅक्टरांवर हल्ला ! नेमकं काय झालं ,जाणून घ्या ..

Arati More

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk