नवी दिल्ली | कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवादी गावात गुरुवारी (१४ डिसेंबर) मरम्मा मंदिराच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर ११ जणांची प्रकृती गंभीर असून जवळपास ९० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनाच्या दोन २ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी रुग्णालयात जाऊन या विषबाधा पीडितांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारांबाबत देखील आदेश दिले आहेत.
Chief minister HD Kumaraswamy visited the K.R. Hospital, Mysuru, where the injured from the Chamarajanagar food poisoning incident is being treated. He consoled the victims of the tragedy, in which 8 people were dead and several others were taken ill. #Chamarajanagar pic.twitter.com/ZsYyhLckJr
— CM of Karnataka (@CMofKarnataka) December 14, 2018
या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रसादामुळे लोकांना उलट्या आणि पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या संपूर्ण प्रकारची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.