HW News Marathi
देश / विदेश

४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस बॉम्ब घेऊन धावला!

भोपाळ – पोलिसांच्या अतुलनीय धैर्याची प्रचिती देणारा प्रसंग शुक्रवारी सकाळी भोपाळजवळ घडला. शाळेजवळ बॉम्ब सापडल्याचा कॉल येताच घटनास्थळी पोचलेल्या पोलीस पथकातील एका हवालदाराने शाळेतील ४०० विद्यार्थ्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली. बॉम्ब शाळेत फुटू नये, म्हणून बॉम्ब घेऊन तो चक्क एक किमी धावत गेला.

भोपाळपासून १७० किमी अंतरावरील चितोरा गावात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. सरकारी शाळमागे बॉम्ब आढळल्याची वर्दी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पथक पोहोचले. बॉम्बविरोधी पथक नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेरअभिषेक पटेल यांनी हाताने तो १२ इंचांचा आणि १० किलोचा बॉम्ब उचलला आणि मानवी वस्तीबाहेरच्या मोकळ्या भागाकडे धावण्यास सुरुवात केली. एक किमी अंतर कापल्यानंतर तो बॉम्ब भिरकावून ते लांब झाले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. ‘शाळेचं कम्पाऊंड आणि रहिवासी परिसर असल्याने बॉम्ब जास्तीत जास्त लांब नेणं, माझं मुख्य लक्ष्य होतं’, असं अभिषेक पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान, हा बॉम्ब नेमका कुठून आला याची माहिती अद्याप मिळाली नसून पोलीस अधिक तपास करीतआहेत. काही दिवसांपूर्वी बन्नड गावातही अशाच प्रकारचा एक बॉम्ब सापडला होता. गावापासून जवळच आर्मी रेंजअसल्यामुळे तेथील हा बॉम्ब असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

#CoronaVirus : आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार

swarit

हाथरस पीडितेचे फोटो आंदोलनांदरम्यान वापरल्याने स्वरा भास्कर,दिग्विजय सिंह यांना नोटीस

News Desk