मुंबई | आज (२६ जानेवारी) भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिवस. विविधतेने नटलेल्या या भारत देशाचा हा प्रजासत्ताक दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशाच्या राजधानी दिल्लीत या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांशिवाश पंकजा मुंडे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे यांनीही शुभेच्छा दिल्या.
Wishing everyone a happy #RepublicDay.
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई।
जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2020
तिरंग्याचा रंग , पाण्याचा रंग ,माझ्या मातीचा रंग सर्व मिसळुन मराठवाड्यात हरित क्रांती व्हावी यांसाठी प्रयत्न करू.. मराठवाडा सुरुवात आहे वंचितांचे विषय सोडवण्याची मुंडे साहेबांचे बोट हातात घेऊन धरली वाट आहे ..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!! #RepublicDayIndia pic.twitter.com/N1GENozXeG— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2020
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #RepublicDay #happyrepublicday #प्रजासत्ताकदिन #हिंदवीस्वराज्य pic.twitter.com/ifkQmIW93g
— Raj Thackeray (@RajThackeray) January 26, 2020
आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.#RepublicDay pic.twitter.com/rsvQIv0hMf— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 26, 2020
देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #RepublicDayIndia #RepublicDay2020 pic.twitter.com/L0m286KNim
— Supriya Sule (@supriya_sule) January 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.