नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने दिली आहे.
रुग्णालयाने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, “प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. ते अद्याप कोमामध्ये असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत,” अशी माहिती दिल्लीतील लष्कर रुग्णालयाने दिली आहे.
There is no change in the condition of former President Pranab Mukherjee this morning. He remains in deep coma and on ventilator support. His vital parameters are stable: Army Hospital (Research and Referral), Delhi Cantonment pic.twitter.com/zLaiOdpEHP
— ANI (@ANI) August 23, 2020
प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी केलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.