बुलंदशहर | संपूर्ण उत्तर प्रदेशला हादरून टाकणाऱ्या बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या हिंसाचारदरम्यान पोलीस निरिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना ३ डिसेंबरला घडली असून अखेर तीन आठवड्यांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत नट याला काल (२८ डिसेंबर) अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलंदशहराचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
Prashant Natt, an accused in #BulandshahrViolence case, was arrested yesterday pic.twitter.com/5XhtCUMNfG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 28, 2018
प्रशांत नटनेच सुबोध सिंह यांची हत्या केली असून प्रशांतला अटक करण्यात आले आहे. आणि उत्तर प्रदेश पोलीस त्यांची चौकशी कसून चौकशी करत आहेत. सुबोध सिंह यांची ज्या रिव्हॉल्वरने हत्या करण्यात आली ते अजून आम्हाला मिळालेले नसल्याची माहिती चौधरी यांनी सांगितले आहे.
उत्तरप्रदेशचे एडीजी आनंद कुमार यांनी सुबोध सिंह यांची हत्या प्रशांत नटने केली तो या प्रकरणातला मुख्य संशयित आहे असे म्हटले होते. प्रशांतला अटक करण्यासाठी तीन ते चार ठिकाणी छापेमारी करण्यात आले. यानंतर अखेर प्रशांत नटला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आत्तापर्यंत सुबोध सिंह यांच्या हत्याप्रकरणात योगेश राज याचा हात होता, असे मानले जात होते. चौकशीदरम्यान प्रशांत नट याने सुबोध सिंह यांच्यावर गोळीबार केल्याचे मान्य केले आहे.बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आले आहे.
#Bulandshahr violence case: Prashant Nat, who allegedly shot Inspector Subodh Kumar was arrested yesterday. Atul Kumar Srivastava, SP Bulandhshahr (city) says, "He has accepted during interrogation that he was the one who fired at Subodh Kumar. Further investigation is underway" pic.twitter.com/hYbuqp8hYI
— ANI (@ANI) December 28, 2018
नेमके काय आहे प्रकरण
बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गायीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.