HW News Marathi
देश / विदेश

नमाज चालतो, जन्माष्टमी का नाही? – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा केलेला चालता, तर जन्माष्टमी का नाही. रस्त्यातील नमाज मला रोखता येत नसेल,तर पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यापासूनही मी कोणाला रोखू शकत नाही, असे रोखठोक वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती, असा टोलाही त्यांनी आधीच्या समाजवादी पाटीच्या सरकारला लगावला. प्रेरणा जनसंचारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळही उपस्थित होते.

अधिका-यांनी मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीम वापरण्याला मनाई केल्याचे सांगितले. त्या वेळी मी त्यांना सर्वच धर्मस्थळांवर माईकवर बंदी घालता येऊ शकते का, असे विचारले. ते जमणार नसेल, तर यात्रा नेहमीसारखी चालू राहील, असे बजावले. कावड यात्रा आहे की, शव यात्रा? कावड यात्रेत बाजा, डमरु, ढोल, चिमटे वाजणार नाहीत, लोक गाणार,नाचणार नसतील तर, ती कावड यात्रा कसली? देशात प्रत्येकाला आपले सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही ख्रिसमसही साजरा करा,’ असेही योगी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | ‘कोरोना’शी लढण्यासाठी टाटांकडून आणखी १००० कोटींची मदत जाहीर

News Desk

नवाज शरीफ यांना सात वर्षांची सजा

News Desk

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

News Desk