HW News Marathi
Covid-19

अमेरिकेतील भारतीयांना धक्का ! डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘H1- B’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

वॉशिंग्टन | अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची घोषित केली होता. मात्र, लॉकडाऊन काळात अमेरिकेतील अनेक नागरिकांनी नोकरी गमावलेल्या असून देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी H1-B व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णयामुळे अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी घेतल्यांचे त्यांनी काल (२२ जून) सांगितले. अमेरिकेतील H1-B व्हिसा या वर्षाच्या शेवटपर्यंत वैध असणार आहे. या निर्णय अमेरिकन कामगारांच्या हितासाठी घेण्यात आला आहे, असे ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणुका होण्यापूर्वी ही घोषणा केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका होण्यापूर्वी ही घोषणा करीत ट्रम्प यांनी विविध व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्या वाढत्या विरोधाकडे दुर्लक्ष केले आहे. H1-B व्हिसाचे निलंबन २४ जूनपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम भारतीय आयटी व्यावसायिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांवरही परिणाम होईल ज्यांना त्यांचा H1-B व्हिसा रिन्यू करण्याची इच्छा होती. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जगभरातल्या २.४ लाख लोकांच्या स्वप्नांना ट्रम्प यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. मात्र, सध्या अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना नवीन नियमांमुळे फारसा फरक पडणार नाही.

H1-B व्हिसा म्हणजे काय

अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना परदेशी कामगारांकडून मिळालेल्या व्हिसाला H1-B व्हिसा म्हणतात. हा व्हिसा निश्चित कालावधीसाठी दिला जातो. H1-B व्हिसा हा गैरप्रवासी व्हिसा आहे. अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना हा व्हिसा अमेरिकेत कमतरता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना काम देण्यासाठी दिला जातो. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !

News Desk

पुण्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अजित पवारांची केंद्राकडे मागणी  

News Desk

चिंताजनक ! दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

News Desk