नवी दिल्ली | दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. बिश्केक येथील एससीओ शिखर संमेलनात मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. यावेळी दहशतवादाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादासंदर्भात पाकिस्तानन दिलेली वचने पाळत नसल्याचे पंतप्रधनान मोदी यांनी यावेळी म्हटले. पाकिस्तानला यासाठी वातावरण तयार करावे लागेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
जिनपिंग यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. “आम्ही परस्परांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यावर मिळून काम करत राहू”, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले. बैठकीच्या सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
Had an extremely fruitful meeting with President Xi Jinping. Our talks included the full spectrum of India-China relations.
We shall continue working together to improve economic and cultural ties between our nations. pic.twitter.com/JIPNS502I3
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2019
जिनपिंग हे १५ जूनला ६६ वर्षांचे होणार आहेत. यानिमित्ताने सर्व भारतीयांतर्फे पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या दिवसांत आपण दोघेही अनेक विषय पुढे नेऊ शकतो. आपल्या दोघांनाही हे करण्यासाठी अधिक वेळ आणि कार्यकाळ मिळाल्याचेही ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.