HW News Marathi
राजकारण

अखेर रोहित पवार यांनीच सांगितले ‘त्या’ भेटीमागचे कारण

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात आज (१३ जून) तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत होत्या. दरम्यान, स्वतः रोहित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रोहित यांची यांच्या ‘सृजन फुटबॉल स्पर्धे’च्या उदघाटनाची निमित्ताने आज अमित ठाकरे आणि रोहित पवार यांची भेट झाल्याची माहिती रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. अमित ठाकरे हे रोहित पवार यांच्या ‘सृजन फुटबॉल स्पर्धे’च्या उदघाटन समारंभासाठी उपस्थित राहिले होते.

“फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. विशेषतः पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते जे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेविरुद्ध बाजू मांडत असतात त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी करण्याची गरज असलेल्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या , या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा असणार आहोत”, असेही रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही केवळ ४८ तास मागितले, त्यांनी ६ महिने दिले !

Gauri Tilekar

दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ?, केजरीवालांची जीभ घसरली

News Desk

“स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे, काही लोकांना सवय असते”, उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोमणा

Aprna