गांधीनगर | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने गुजरातमधील पुतळ्याचे आज (बुधवारी) पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अनावरण होणार आहे. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू आॅफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
स्टॅच्यू आॅफ युनिटी पुतळ्याच्या कामाची सुरुवात २०१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आज अनावरण झाल्यानंतर उद्यापासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. संपूर्ण ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायची असेल तर त्याचा तिकीट दर ५०० रुपये आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह आणि क्रीडा मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी “युनिट रन टू युनिटी” ध्वजांकित केले. जिमनास्ट दीपा कर्माकर, इतर खेळाडूंसह उपस्थित होते.
https://www.facebook.com/hwmarathi/videos/719641155100905/
Delhi: #Visuals of #RunForUnity from near India Gate. Sardar Vallabhbhai Patel's #StatueOfUnity, the tallest statue in the world, will be inaugurated in Gujarat's Sadhu Bet on his 143rd birth anniversary today. pic.twitter.com/MPSx8VOnlq
— ANI (@ANI) October 31, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.