HW News Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधान मोदी 12 जुलैला देवघर आणि पाटण्याला देणार भेट

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलै 2022 रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमाराला देवघर आणि पाटण्याला भेट देणार आहेत. देवघरमध्ये 16 हजार 000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास पंतप्रधान करतील. त्यानंतर दुपारी 2.40 च्या सुमारास बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा बैद्यनाथ मंदिरात ते दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास, पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील.

पंतप्रधानांचे देवघरमधील कार्यक्रम

पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे, संपर्क व्यवस्था वाढवणे आणि प्रदेशातील राहणीमान सुलभतेला चालना देण्यासाठी देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण पंतप्रधान करतील. या प्रकल्पांमुळे या भागातील सामाजिक-आर्थिक सुबत्ता लक्षणीयरीत्या सुधारण्यास मदत होईल.

देशभरातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या बाबा बैद्यनाथ धामकरता थेट संपर्क व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या देवघर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. सुमारे 400 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ उभारले आहे. वार्षिक पाच लाखांहून अधिक प्रवाशांचे नियोजन करण्यासाठी विमानतळाची टर्मिनल इमारत सुसज्ज आहे.

देवघरमधील एम्स हे संपूर्ण प्रदेशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी वरदान आहे. पंतप्रधान, देवघर इथल्या एम्स इथला आंतर रूग्ण विभाग (आयपीडी) आणि शस्त्रक्रिया विभागयांच्या सेवा राष्ट्राला समर्पित करतील त्यामुळे इथल्या सेवांना आणखी चालना मिळेल.

देशाच्या सर्व भागात सर्वोत्तम आरोग्य सुविधा विकसित करण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येय धोरणानुसारच यांची उभारली केली आहे. देशभरातील धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि अशा सर्व ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पंतप्रधानांनी वचनबद्धता व्यक्त केली आहे. त्यानुसार पर्यटन मंत्रालयाच्या योजनेचे उद्घाटन होणार आहे. यामुळे प्रसाद योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या “बैद्यनाथ धाम, देवघरचा विकास” प्रकल्पाच्या घटकांना आणखी चालना मिळणार आहे.

पंतप्रधान पाटणा दौरा

पंतप्रधान आज बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समापन कार्यक्रमाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान शताब्दी स्मृती स्तंभाचे उद्घाटन करतील. बिहार विधानसभेच्या कामकाजाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. यावेळी विधानसभा वस्तुसंग्रहालयची पायभरणी पंतप्रधान करतील. या वस्तुसंग्रहालय गॅलरीमध्ये बिहार लोकशाहीचा इतिहास

सध्याचे लोकजीवन याचे प्रदर्शन होणार आहे. या वस्तुसंग्रहालयात एक सभागृह असेल ज्याची आसन क्षमता 250 एवढी असेल. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विधानसभा अतिथीगृहाचीही पायभरणी करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदवार्ता ! ‘चांद्रयान- २’ चे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

पंधरा दिवसांत भारत- चीन युद्ध पेटणार

News Desk

आपच्या मदतीला यशवंत सिन्हा

swarit