HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

नवी दिल्‍ली | राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी नवीन ‘पीएम श्री स्कूल्स’ योजनेची घोषणा केली. विकसित भारताच्या उभारणीसाठी पीएम स्कूल्स (PM ScHools for Rising India) या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील 14,500 पेक्षा जास्त शाळा अद्ययावत आणि विकसित केल्या जाणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सर्व उद्दिष्टे पीएम श्री स्कूल्स मध्ये दिसून येतील आणि या शाळा शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे आदर्श उदाहरण तसेच आसपासच्या भागातील शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करतील. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास हे या शाळांचे मुख्य उद्देश असतील, त्यासोबतच सर्वंकष आणि चौफेर गुणवत्ता असलेले तसेच 21 व्या शतकातील महत्वाची कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्ती निर्माण केल्या जातील.

ह्या PM-SHRI शाळांमध्ये अध्ययन-अध्यापनासाठी आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वंकष पद्धती वापरल्या जातील. संशोधन प्रणित, अध्ययनकेंद्री अशी ही शिक्षणपद्धती असेल. या शाळा, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श शाळा ठरतील, अशा मला विश्वास आहे, अशी भावना पंतप्रधानांनी ही घोषणा करताना व्यक्त केली.

पंतप्रधानांनी ट्वीट मालिकेतून या योजनेविषयी माहिती दिली 

“आज #TeachersDay च्या निमित्ताने मला एका नवीन उपक्रमाची घोषणा करतांना अतिशय आनंद होत आहे. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) या योजनेअंतर्गत, देशातील 14,500 शाळा विकसित आणि अद्ययावत केल्या जाणार आहेत. ह्या शाळा आदर्श शाळा ठरतील आणि त्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे संपूर्ण उद्दिष्ट त्यातून साध्य केले जाऊ शकेल.”

“ह्या PM-SHRI शाळांमध्ये शिक्षण अध्ययनासाठी आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वंकष पद्धती वापरल्या जातील. संशोधन प्रणित, अध्ययनकेंद्री अशी ही शिक्षणपद्धती असेल. तसेच या शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, जसे की अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट वर्गखोल्या, क्रीडा सुविधा आणि इतर अनेक सुविधांवर भर दिला जाईल.”

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने गेल्या काही काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवले आहेत. मला खात्री आहे, पीएम- श्री (PM-SHRI) शाळा देखील, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना असे शिक्षण देऊन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठे योगदान देतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP Elections 2022 : काँग्रेसकडून उमदेवारांची पहिली यादी जाहीर; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आई उमेदवारी

Aprna

#FightCorona | देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटीलेटर्स बनविण्याचे केंद्राचे आदेश

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांशी पुन्हा वाद

Gauri Tilekar