HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान दिला जातो. ‘पॉलिसी लिडरशीप’ या विभागातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. संयुक्त राष्ट्राने काही दिवसांआधीच या पुरस्काराची घोषणा केली होती. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तिथे उपस्थित होत्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मँक्रो यांनादेखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात घेतलेल्या ऐतिहासिक पुढाकारामुळे पंतप्रधान मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरऊर्जेवर कार्यरत असणारे देशातील पहिले विमानतळ आहे. सस्टेनेबल एनर्जी क्षेत्रातील गतिमानतेसाठी दाखविलेल्या दूरदृष्टीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related posts

“काही मिनिटांतच जमिनीचा भाव कसा दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?”, सेनेचा सवाल

News Desk

माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखर यांचा मृत्यू

News Desk

ओडिशात धुमाकूळ घालणाऱ्या वादळात जन्मली ‘फनी’

News Desk