HW News Marathi
देश / विदेश

माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखर यांचा मृत्यू

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर याचा आज (१६ एप्रिल) यांचा मृत्यू झाला. शेखर तिवारी याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये रोहित बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला. दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात शेखरने अखेरचा श्वास घेतला आहे. परंतु उपचापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

मागील वर्षी १८ ऑक्टोबर २०१८ रोजी एनडी तिवारी यांचे निधन झाले होते. २००८ मध्ये रोहित शेखरने न्यायालयात खटला दाखल करून एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. डीएनए रिपोर्टमध्ये ही बाब उघडकीस आल्यानंतर मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचे मान्य केले होते. यानंतर तिवारी यांनी २०१४ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी लग्न केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput | CBI कडून ६ आरोपींसह अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल

News Desk

“तर मी आत्महत्या करेन…” राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

News Desk

तपासासाठी मशिदीत गेलेल्या पोलिसांवर लोकांकडून दगडफेक

Gauri Tilekar