HW News Marathi
देश / विदेश

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

मुंबई | भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपाचर सुरू होते. लता मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लतादीदींवर आज सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  मुंबईत दाखल झाले असून ते शिवाजी पार्कच्या दिशने रवाना झाले आहे. 

लता मंगेशकर यांचे पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झाले. लतादीदीची शेवटचा प्रवास सुरू आहे असून ‘लतादीदी अमर रहे’ अशा घोषणा त्यांचे चाहाते देत असून चाहात्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी केली आहे. लतादीदींचा शेवटाचा प्रवास हा त्यांचे निवसस्थान प्रभुकुंज येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क मैदान) दाखल होणार आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ज्या पद्धतीने व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात स्टेज उभारण्यात येण्यास सुरुवात झाली असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कातील व्यवस्थेची पाहाणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही ऐकलं होतं….निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असते !

News Desk

कोरोनाचा महाराष्ट्रात तिसरा बळी , देशात ८ रूग्णांचा मृत्यु

Arati More

काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

swarit