HW Marathi
देश / विदेश राजकारण

महात्मा गांधी ‘हे’ तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ‘ते’ जीवन !

नवी दिल्ली | ‘जर आम्ही जुन्या पद्धतीने काम केले असते तर देश बदलला नसता,’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली.  ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी हे तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ते जीवन आहेत’, अशा शब्दात मोदींनी काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर आज (६ फेब्रुवारी) अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवेदन केले.

मोदी भाषणासाठी उभे राहिल्यावर विरोधकांनी महात्मा गांधी की जय अशा घोषणा देण्यास सरुवात केलीआहे. यानंतर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. भाषणादरम्यान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे, असे मोदींना म्हटले.

“पंतप्रधान मोदींनी लोकसभेत यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  ६ महिन्यांनंतर देशातील तरुण मोदींच्या पाठीवर लाठ्या मारतील, असे राहुल गांधींनी दिल्लीतील सभेत बोलताना म्हणाले. “मी सहा महिन्यात ऐवढे सुर्यनमस्कारांची संख्या वाढवावी. जेणेकरुन माझी पाठ लाठ्या झेलण्यासाठी आणखी मजबूत होईल.  तुम्ही मला पूर्व कल्पाना दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता मला व्यायाम करण्या पुरेसा कालावधी मिळणार आहे. मी ३०-४० मिनिटांपासून बोलत आहे, पण आता करंट बसला. ट्यूबलाईट पेटायला वेळ लागतो” असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदींनी लोकसभेतील भाषणदरम्यान म्हणाले की, ” त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आली, नाव न घेता मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली.. दरम्यान काँग्रेससाठी देशातील जे लोक मुस्लीम आहेत. ते आमच्यासाठी भारतीय आहे,” असे मोदी म्हणाले.

Related posts

शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर !

News Desk

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk

१५ कोटी वर्षापूर्वीचे डायनासॉरचे आवशेष सापडले

News Desk