HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत

नवी दिल्ली । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले आहेत. ट्रम्प यांचा हा दोन दिवसीय भारत दौरा असणार आहे. ट्रम्प सरदार वल्लभ भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे गळाभेट करत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्या भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे. त्यानंतर ट्रम्प १२.१५ वाजताच्या सुमारास साबरमती आश्रम येथे पोहोचतील. अमेरिकेहून रवाना झाले असून कोणत्याही क्षण ट्रम्प अहमदाबादला पोहचतील. ट्रम्प यांचा दौरा आज (२४ फेब्रुवारी) ते उद्या (२५ फेब्रुवारी ) असा असणार आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1231801865815220224?s=20

ट्रम्प यांचा भारत दौऱ्यासाठी त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांनी हिंदीमध्ये ट्वीट करत भारत दौऱ्याची उत्सकता असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “आम्ही भारतात येण्यासाठी उत्सुक आहोत. रस्त्यात असून अवघ्या काही तासांतच आम्ही सर्वांना भेटणार आहोत.” ट्रम्पच्या स्वागतसाठी संपूर्ण अहमदाबाद सज्ज असून रस्त्यावर ट्रम्प यांच्या स्वागताच्या पोस्टर्ससोबतच अमेरिकेचे राष्ट्रध्वजही लावण्यात आले आहेत. ज्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा ताफा जाणार आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेटिंग करण्यात आले असून बॅरिकेट्सच्या आतील बाजूस लोक उभे असणार आहेत. लोकांसाठी मोठ्या एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत.

असे आहे ट्रम्पचा दोन दिवसीय भारत दौऱ्याचा कार्यक्रम

२४ फेब्रुवारीचा कार्यक्रम

  • अमेरिकी राष्ट्रपतींसह त्यांचे कुटुंब २४ फेब्रुवारीला सकाळी ११.४० वाजता अहमदाबादमध्ये येणार आहेत
  • पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहेत
  • अहमदाबाद शहरात ट्रंप यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे
  • १२.१५ वाजता ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे
  • १.०५ वाजता जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करतील आणि या भव्य कार्यक्रमानंतर ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये लाखो जणांना संबोधित करतील
  • ३.३० वाजता अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे.
  • ४.४५ वाजता आग्र्याला पोहोचतील.
  • ५.१५ वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे.
  • ताजमहलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुले आणि दिल्लीकर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभी असतील.
  • ट्रम्पच्या स्वागत ताजमहलाच्या अवती भवती ३ हजार कलाकार वाटेत नृत्यही सादर करणार आहेत. या कलाकारांना युपीहून आमंत्रिक केले गेलेय.६.४५ला निघून ७.३० ला दिल्लीला पोहोचतील

२५ फेब्रुवारीचा कार्यक्रम

  • ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत सकाळी १० वाजता
  • सकाळी .१०.३०वाजता महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील
  • सकाळी ११.००: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
  • दुपारी १२.४० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
  • संध्याकाळी ७.३० वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसह चर्चा पार पडेल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk

पंतप्रधान खूप दिलदार, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील!

News Desk

श्नीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे कारमध्ये स्फोट

News Desk