मुंबई । टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचे अपघाती निधन झाले आहे. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीजला पालघरमधील चारोटी येथे अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबाद-मुंबईच्या दिशने येत असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सायरस मिस्त्री यांनी २०१९ मध्ये टाटा समूहाची सूत्रे सांभाळली आहे. सारस मिस्त्रींनीच्या अपघाती निधननंतर सर्व सस्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
The untimely demise of Shri Cyrus Mistry is shocking. He was a promising business leader who believed in India’s economic prowess. His passing away is a big loss to the world of commerce and industry. Condolences to his family and friends. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हणाले, “टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सारस मिस्त्री यांच्या अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योगपती होते. त्यांच्या अचानक जाण्याने उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला माझ्याकडून संवेदना.”
Deeply saddened to hear about the shocking news of the untimely demise of the former Tata Sons Chairman Cyrus Mistry.
He was a dynamic and brilliant entrepreneur. We lost one of the brightest star of Corporate World.— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 4, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक गतिमान आणि हुशार उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला.” काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले, “टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने दु:ख झाले. ते देशातील सर्वात तेजस्वी व्यावसायिक मनांपैकी होते, ज्यांनी भारताच्या विकास कथेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र माझ्या मनःपूर्वक संवेदना.
Saddened by the tragic news of the demise of former Chairman of Tata Sons, Cyrus Mistry.
He was amongst the brightest business minds of the country, who made a significant contribution to India’s growth story.
My heartfelt condolences to his family, friends and admirers.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 4, 2022
सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय
उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे सायरस मिस्त्री हे धाकटे सुपूत्र होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील पारसी कुंटुंबात झाला. सायरस मिस्त्री यांचे लंडन बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेज यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सायरस मिस्त्रींनी शापूरजी पल्लोनजी समूहाचे मॅनेजिग डायरेक्टर पद सुद्धा त्यांनी भूषवले होते. २००६ साली ते टाटा समुहाचे सदस्य बनले असून २०१३ मध्ये वयाच्या ४३ व्या वर्षीच सायरस मिस्त्री टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. परंतु, २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा समुहाच्या प्रमुख पदावरून हक्कालपट्टी केली होती. यानंतर सायरस मिस्त्री आणि टाटा समूह यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. तसेच २६/११ हल्ल्यात जखमी आणि यांच्यासह मृतांना टाटा समूहाकडून मदत देण्यात सायरस मिस्त्री यांचा मोठा वाटा होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.