नवी दिल्ली। जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या वाढ होऊन २९वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘होली मिलन’दरम्याम होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय ट्वीट करत देशातील जनतेला सांगितला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (४ मार्च) आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी यासाठी यावर्षी कोणत्याही ‘होळी’च्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विटमध्ये म्हणाले आहे.
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2020
तसेच मोदींपाठोपाठ गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही होळी न खेळण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनातही होळी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यात २१ पर्यटकांपैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यालयाकडून दिली आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आले आहे.
Home Minister Amit Shah tweets, "Holi is a very important festival for we Indians but in the wake of Coronavirus, I've decided not to participate in any Holi Milan celebration this year. I also appeal to everyone to avoid public gatherings&take good care of yourself&your family". https://t.co/l4UwC5Sz7v pic.twitter.com/rUXFoa7QH3
— ANI (@ANI) March 4, 2020
कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६ होती. त्यात आता इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांची भर पडल्याने हा आकडा २९ वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीची उपाययोजना सुरू केल्या आहेत. ३ मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर भारतात प्रवेश दिला जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.