HW News Marathi
देश / विदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र केले अर्पण

मुंबई । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आपली श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पुष्पचक्र अर्पण करुन आपली श्रद्धांजली वाहिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री शाहरुख खान, अभिनेता रणवीर कपूर या पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

लता दीदींच्या राहत्या घरी प्रभुकुंज येथून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पर्यंत फुलांनी सजलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसोबत त्यांचे निकटवर्तीय होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते उपस्थित होते, यावेळी अनेकांना लतादीदींना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी ऑक्सिजन पुरवणाऱ्याला अटक

News Desk

तुर्कस्तानमध्ये 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

Aprna

ऐकलत का, आता २० रुपयाचे नाणे आले

News Desk