नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (११ मे) दुपारी ३ वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मोंदींची ही मुख्यमंत्र्यांसोबतची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेली पाचवी बैठक आहे. या बैठकीत देशातील सर्व राज्यात कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढवा घेण्यात येणार आहे.
Prime Minister Narendra Modi will hold video conferencing with all the Chief Ministers tomorrow at 3 pm: Sources. #Covid19 pic.twitter.com/lFo2W7fINg
— ANI (@ANI) May 10, 2020
देशातील १७ मेपर्यंतचा तिसरा लॉकडाऊन संपणार आहे. भारतातील काही राज्यांची ३ झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. देशातील ३१९ जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आहेत. तर २८४ जिल्हे हे ऑरेज झोनमध्ये असणार आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या सर्वाधिक आहे. त्या ठिकाणी कोणत्या उपायोजना करण्यात येणार चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
देशातील करोनाबाधितांची संख्या ६२ हजार ९३९ वर पोहचलीय. तर २ हजार १०९ जणांनी आपले प्राण गमावले आहे. आतापर्यंत देशात १९ हजार ३५८ जणांवर कोरोना मुक्त झाले आहे. देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २० हजार २२८ रुग्ण आढळले आहेत तर ७७९ जणांनी प्राण गमावले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.