नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इतिहासातील घटनांवरून टीका करत काँग्रेसवर तोंडसुख घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी शाहबानो प्रकरणाची आठवण करून देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “जेव्हा शाहबानो प्रकरण सुरू होते तेव्हा काँग्रेसच्या एका मंत्र्याने एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की, मुस्लिमांच्या उत्थानाची जबाबदारी काँग्रेसची नाही. त्यांना गटारात राहायचे असेल तर राहू दे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या माहितीवर काँग्रेसकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.
PM Modi: What one of the main Congress ministers during Shah bano case said in an interview recently is shocking, he said other Cong ministers remarked that it was not the job of the Congress to reform Muslims, “if they want to lie in the gutter let them be” is what they said. https://t.co/onH5oaGhY7
— ANI (@ANI) June 25, 2019
पंतप्रधान मोदींनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे पुरावे सादर करावेत, अशी जोरदार मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. त्यावर “तुम्हाला पुरावा मिळेल. मी तुम्हाला त्याची युट्युब लीक पाठवेन”, असे पंतप्रधान मोदी काँग्रेसला उद्देशून म्हणाले. “शहबानो प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसला एक चांगली संधी मिळाली होती. लिंग समानतेच्या दृष्टीने देशात एक प्रकारचे पोषक वातावरण देखील निर्माण झाले होते. मात्र काँग्रेस ही संधी गमावली”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सारखंसारखं तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही !
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी (२४ जून) विचारलेल्या प्रश्नावर देखील पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे. “ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांनी आनंद घ्यावा. सारखंसारखं तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही”, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी आणि भाजप दोनदा सत्तेवर आले. मात्र, जर ते चोर असतील तर ते संसदेत कसे बसलेत ?”, असा खोचक सवाल अधीर रंजन यांनी मोदींना केला होता. इतकेच नव्हे तर अधीर रंजन यांनी मोदींवर अत्यंत वाईट शब्दात टीका देखील केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.